मनाला विलक्षण मोहुनी जातात
निढया स्वच्छ नभामधला
शीतल रसास्वाद देऊनी जातात
सात रंगाच्या सात कला
आयुष्याला ओलावा देणाऱ्या भासल्या
त्या सांजवलेल्या सप्तांच्या प्रितित
सुमनकड़ा हर्षाने लाजलया
सात रंग म्हणजे
ता - ना - पि - हि - नि - पा - जा
या सात राण्यांच्या
इंद्र शोभते मुखकमल राजा
सात रंगाच्या एकोप्यात
वाटतो मनाला हेवा
जीवनाला रंगमय बनविण्यासाठी
इंद्रधनुष्याला साक्ष ठेवा
सात रंगाचे सात संदेश
मनाशी त्यांची किल्ली बांधा
'' सर्वधर्म समभाव '' या प्रमाणे
जगात शांततेने नांदा।