What does life mean? | जीवनाचा अर्थ काय ?

मानव ! मानव हा सजिवातील सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. खरच तो आहे का ? मानव आपल्याच जीवनाच्या धुंदीत जगत असतो.जगतांना कुणावर प्रीत ही करतो. पण त्याला जीवनाचा अर्थ काय हे समजले आहे का ? 
What does life mean? | जीवनाचा अर्थ काय ?


जीवनाचा अर्थ | Meaning of life

जी म्हणजे जगने , वन म्हणजे सुख-दुःखा चा येणारा वनवा होय. जीवन हा शब्द लहन असला तरी त्यातील अर्थ महान आहे.जीवनाचा खरा अर्थ जगूनच कळतो.पुस्तकी ज्ञानाने जीवन हे फक्त चित्रपट वाटते अनुभवातून जीवनाचा खरा अर्थ कळतो.

'' जन्म हे निसर्गाचा वत्सल्य स्मित आहे.जगणं कसं आपआपसात गुप्त आहे.दुःखात सोबत्याची जागा रिक्त आहे. दुःखाच्या समोर सुखाची जीत आहे.जगतांना जीवन कधी भीत आहे, कधी उष्ण तर कधी शीत आहे. प्रीति हे सुमधुर गीत आहे. मृत्यु ही तिची राग काढण्याची रीत आहे ''


जगतांना माणसाची बुद्धि आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच जमत नही. यात कधी अमृत फळ तर कधी कवंडळ लागतात. कुठे प्रान्त सकाळ, कुठे दुपारचा सूर्य प्रकाश तर कुठे मध्यरात्रीचा काळोख असतो. जग म्हणजे जनन व ग म्हणजे गमन यातील अंतर हेच जीवन ! असा जगाचा व जीवनाचा अर्थ ! पण या जगाचा स्वप्न पाहण्याचा आनंद आहे.स्वप्न भंगातुन होणार विषाद ही आहे.भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मानव जन्माला आलेला नही.

''जुल्म सहने के लिए पैदा नहीं हुये तुम ! हिम्मत रखो, शासन करने वाले कौम बनो ! हम मजबूर है, कहने के लिये पैदा नहीं हुये तुम!''


हे सर्व करतांना जीवन जगतांना कधी आपलाच जय तर कधी आपलाच पराजय होतो. हे अनुभव घेतल्या शिवाय मानवाला जीवनाचा अर्थ कळत नाही. मानवाच्या जशी उच्छखाल आसक्ति आहे. मनुष्य एकरंगी नाही त्याचा खरा सबंध इश्वराशीच आहे. काही मनुष्याचं व्यक्ति उत्तुंग आदर्श तर मनुष्यांच अधोगतीची परिसीमा गाढलेल्या वास्तापन या वास्तवातं श्रावनातल्या ऊन पावसा सारखा प्रेम आणि कलह यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो, या स्त्री पुरुषाच्या जीवनात !

जीवनाचा अर्थ जगुणच कळतो निरपेक्ष प्रेम केल्यावरच प्रितीचा अर्थ कळतो अंतरीच्या ओढीन जो दुसऱ्याचे दुःख वाटून घेईल. त्यालाच प्रीति हा मानवाच्या शापित जीवनाला निसर्गात दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती आहे.म्हणून आषाढ़ातल्या पावसा सारखे, कोजागिरिच्या चांदण्यासारखे त्यांच्यावर माया कर. लाकूड पोखरणाऱ्या भुग्यासारखा जीवनाचा अर्थ काय ? प्रितीचा अर्थ काय ? हा प्रश्न नेहमीच मन क़ुरतडु लागतो उन्हात नदया आटतात.हिवाळ्यात गोठतात पण समुद्र कधीच आटत नही, गोठत नाही ! पण माणसाचे मन का आटत ? का गोठत ? कुणीही मित्र असो मित्र हा जेव्हा मित्र वाटु लागतो तेव्हा त्याच्या जवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला जवळ ओढ़ले पाहिजे माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते! पण हे नाते समजायला किती विचित्र आहे. जवळच्या माणसांची क़ीमत कळायला सुद्धा त्याचापासून दूर जावं लागत! '' आकऱ्या जवाई भाकऱ्या। गावचा जवाई ढूकऱ्या '' या प्रमाणे स्थिति होते.

जगात माणसाची दोन जाती आहेत एक मनाची मागणी आणि दूसरी मुर्दाड मनाची! या जगात आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आभाळाचा अर्थ कळत नाही.

यह भी जरूर पढ़े                      
Share on Google Plus

About Blog Admin

He is CEO and Faunder of www.pravingyan.com He writes on this blog about Tech, Poems, Love story, General knowledge, Earn money, Helth tips, Great lord and motivational stories. He do share on this blog regularly.